कुणाला पाण्याचा ग्लास
अर्धा भरलेला वाटतो तर कुणाला अर्धा रिकामा
दुसर्याचा आनंद पाहून
कुणाला आनंद होतो कुणाला ईर्ष्या
कुणाला लहानशा गोष्टीत आनंद सापडतो
तर कुणाला सुखात हि कसली तरी उणीव भासते
कुणाला स्वतःची दया येते आणि दुसर्याचा हेवा वाटत असतो
आणि कुणाला उलट दुसर्याची दया आणि स्वताचा हेवा वाटत राहतो
निर्णय तर आपण सर्वच घेतो
काही विचार करून तर काही रागाच्याभरात
परिस्थितीला सर्वच तोंड देतात
काही निर्भिडपणे तर काही भीतीने
परिस्थिती सर्वांनासाठी सारखीच असते
बदल असतो तो तुमच्या "दृष्टिकोनात"
आयुष्यात दुःखाची उजळणी करत राहिलो तर सुखाचा धडा कधी सुरु होणार नाही
आणि दृष्टिकोण बदलल्याशिवाय परिस्थिति बदलणार नाही ……….
Chup chann ��
उत्तर द्याहटवा