संध्याकाळी समुद्रकिनारी सहजच फिरायला आलो. समोर विविध रंगांनी आभाळ रंगून गेलं होत दूरवर जमीन आणि पाणी एकत्र आल्याच पाहिलं आणि बालपणाच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या "वो बचपन के भी क्या दिन थे ।".
लहानपणी जायचो फिरायला दूर बाबा सोबत, कधी समुद्र किनारी,भाजीमंडईमध्ये तर कधी सहज वाट नेईल तिथे. मोकळा रस्ता समोर निरभ्र आकाश मजा यायची फिरायला. आणि लहानपणी उत्सुकता असायची ती एकाच गोष्टीची क्षितिजाची. जिथे आकाश आणि भूमी एक होतात तो भाग म्हणजे "क्षितिज"
आणि बाबा चा हाथ सोडून त्या क्षितिजा मागे धावत जायचो आणि आईची आठवण यायची अर्थातच इतकं सुसाट धावल्यावर पडणारच ना मग आपसूक तोंडून आई गssss शब्द यायचे आणि थांबायचो।
बाबा नेहमी सांगायचा "अरे, या क्षितिजा मागे धावून नको हो, दिसायला फार सुंदर दिसतं हे आकर्षक, मनमोहक पण लांबूनच. जितकं जवळ जाशील हे तितकंच लांब जातं. बघ ना याच्या मागे धावत धावत किती लांब आलास तू. "
हो खरंच,किती लांब गेलो होतो मी तेव्हा त्या क्षितिजामागे धावता धावता बाबा मागे आहे हयाचं सुद्धा भान नव्हत मला.
बघ हो,क्षितिजा मागे धावता धावता मलापण विसरलास,म्हणाला होता बाबा. आणि मी वळून sorry म्हणालो होतो तेव्हा , आजही आठवतंय....
बाबाने तेव्हा किती कमी शब्दात जीवनाचं सार समजावलं होतं.. बस तेव्हा बालबुद्धिला समजलं नव्हतं पण आज सर्व समजत आहे.
बाबाने तेव्हा किती कमी शब्दात जीवनाचं सार समजावलं होतं.. बस तेव्हा बालबुद्धिला समजलं नव्हतं पण आज सर्व समजत आहे.
शिक्षणासाठी मुंबईला आलो आणि नंतर इथेच स्थाईत झालो आई बाबा गावीच राहिले. माझं घर घेतल्यावर बोलवलं ही त्यांना एकदा दोनदा पण ते तिथेच खुश आहेत वाटतं. घर कसलं ते नुसता flat घर तर ते जिथे सर्व गुण्यागोविंदाने राहतात माझे सर्व तर गावाकडेच राहिले . कधीकधी वाटायंच,"राग आला असेल का ?माझा त्यांना. " इतके वर्ष मी साधी विचारपूसही केली नव्हती. फक्त दर महिना मनीऑर्डर पुरती तार यायची त्यांची तितकाच काय तो संबंध कधी गावी गेलो नाही.सुरवातीला आई फोन करायची पण मला वेळ नसायचा कॉलेज क्लास यातच वेळ जायचा सर्व, मग कंटाळा यायचा आणि बोलायचं राहूनचं जायचं कॉल बॅक नाहीच केला कधी.
नंतर नंतर मी माझं करीयर करण्यात गुंतून गेलो.आणि हळू हळू आईचे फोन पण यायचे कमी झाले आणि शेवटी बंदच. मात्र तार अजूनही सुरूच होती फरक इतकाच कि आधी गावाकडून मनीऑर्डर यायची आणि आता मी दर महिना पैसे पाठवायचो. आणि आता तर आई बाबाच राहिले नाही मग गावाकडे जायचा प्रश्नच उरला नाही आणि मनीऑर्डर पण बंद .
आज मी माझं क्षितिज गाठलं माझी सर्व स्वप्न पूर्ण केली त्या क्षितिजाचा पाठलाग केला .. आज मी सर्जन आहे.माझं स्वतःच हॉस्पिटल आहे. गरजू लोकांसाठी एक क्लिनिक काढलं आहे. आज सर्व काही आहे माझ्याकडे, पण आई बाबा नाही सोबतीला, नाही जास्त मित्र; संपत्ती खूप कमावली पण आपली माणसं मात्र हरवली. बाबा बरोबर बोलायचा आज समजतंय मला.
मी वेडा क्षितिजा चा पाठलाग करत राहिलो आणि गाठलं माझं "क्षितिज" पण या क्षितिजाचा पाठलाग करता करता खरंच आपली माणसं कधी मागे राहून गेली समजलंही नाही आणि समजलं तेव्हा उशीर झालेला आहे.