असा कसा रे समाज माझा ?
मुलगा झाला म्हणून उत्सव साजरा करणारा तर मुलीला गर्भात मारणारा
आणि स्त्री भ्रूण हत्या रोखा म्हणून जनजागृती करत फिरणारा …
असा कसा रे समाज माझा ?
आईला देव मानणारा आणि तिलाच देवळात जाऊ न देणारा
स्त्री ची पूजा करणारा आणि तिलाच विटाळ समजणारा
असा कसा रे समाज माझा ?
मुलाने मुलगी पळवून आणली तर अभिमानाने सांगणारा
आणि स्व:ताची मुलगी पळून गेली म्हणून तिला वाळीत टाकणारा
असा कसा रे समाज माझा ?
स्त्री स्वतंत्र आहे म्हणत भावनांच्या बंधात तिला जखडणारा,
स्त्री सुरक्षेसाठी झगडणारा आणि तिच्यावरच अत्याचार करणारा

दाखल्यावर जात लिहणारा आणि शाळेत सर्व धर्म समभाव शिकवणारा
आणि भारतीय माझे बांधव म्हणत जातीवादाला बळी पडणारा
असा कसा रे समाज माझा ?
मुलाने मुलगी पळवून आणली तर अभिमानाने सांगणारा
आणि स्व:ताची मुलगी पळून गेली म्हणून तिला वाळीत टाकणारा
असा कसा रे समाज माझा ?
स्त्री स्वतंत्र आहे म्हणत भावनांच्या बंधात तिला जखडणारा,
स्त्री सुरक्षेसाठी झगडणारा आणि तिच्यावरच अत्याचार करणारा
असा कसा रे समाज माझा ?
जिवंतपणी अवहेलना करणारा आणि मेल्यावर गोडवे गाणारा
Smart जगात वावरतानाही अंधश्रद्धेला बळी पडणारा