आयुष्य हे असं जगायचं असतं
कधी हसता हसता डोळे भरून येतात ,
तर कधी डोळ्यात दाटलेल्या अश्रूंना
लपवायला हसावं लागतं ………
कधी मनात नसतानाही बोलावं लागतं
तर कधी बोलायचं असूनही सारे काही मनात ठेवावं लागतं ……….
आयुष्य हे असं जगायचं असतं
कधी हसावं लागतं ,कधी रडावं लागतं ……
मुखवटा घालून जगात वावरावं लागतं .........
आयुष्य हे असं जगायचं असतं ...........